तुमचा ऑर्थोपेडिक वेलनेसचा प्रवास इथूनच सुरू होतो...

सर्वोत्तम उपचार, पेशंटची काळजी तसेच तज्ञ व पारंगत डॉक्टर्सची टीम आणि सांगलीच्या मध्यवर्ती सिव्हिल चौकातील सुसज्ज असलेले हॉस्पिटल. 

म्हैशाळकर शिंदे ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये, आम्ही आमच्या रुग्णांना अपवादात्मक ऑर्थोपेडिक काळजी आणि उपचार देण्यासाठी समर्पित आहोत. 

म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटलचं का ?

3५ वर्षे अविरत सेवेची

म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटलमधून बाहेर पडणारा पेशंट पूर्वीसारखा ठणठणीत बरा होऊनच बाहेर पडतो. आणि त्यामुळेच गेल्या 35 वर्षांपासून म्हैशाळकर शिंदे ऑर्थोपेडिक हॉस्पिटलने ऑर्थोपेडिक रुग्णांना सर्वोत्तम उपचार आणि सुविधा देत सांगलीतील अग्रेसर हॉस्पिटल म्हणून नाव मिळवलं आहे.

500+

यशस्वी शस्त्रक्रिया

35+

वर्षांचा अनुभव

100+

बेडेड रुग्णालय

95%

सक्सेस रेट

आमची स्पेशालिटी

ऑर्थोपेडिक केअरला नवीन उंचीवर नेणे...

फ्रॅक्चर

अपघाती घटनांमुळे मोडलेले हाड पूर्णपणे पाहिल्यासारखे नीट करून देण्यासाठी आमची तज्ञ ऑर्थोपेडिक टीम तयार आहे. उपचारादरम्यान तुम्हाला त्रास होऊ न देता इलाज करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स आहेत.

गुडघ्याच्या शस्त्रक्रिया

आंशिक तसेच संपूर्ण गुडघा बदल शस्त्रक्रिया. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त भारतीय तसेच इंपोर्टेड गुडघा बदल पद्धती म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध.

खुबा बदल शस्त्रक्रिया

झीज झालेल्या खुब्याच्या सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना तसेच खुब्याच्या हाडाचे अपघाती फ्रॅक्चर या कारणाने संपूर्ण खुबा बदल शस्त्रक्रिया पार पाडण्यात येते.

मणक्याची शस्त्रक्रिया

मणक्याचा वाकडेपणा म्हणजेच मणक्याचे कुबड सरळ करण्याची शस्त्रक्रिया तसेच मणक्याच्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी परिसरातील महत्वाचे हॉस्पिटल म्हणून ओळख.

खांद्याच्या शस्त्रक्रिया

खांद्याची झालेली झीज किंवा अपघाती फ्रॅक्चर तसेच निसटलेला खांदा पूर्ववत करण्यासाठी संपूर्ण खांदा बदल आणि रिवर्स खांदा बदल या दोन शश्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये उपलब्ध.

सर्व क्रीडा दुखापती आणि आर्थ्रोस्कोपी

खेळादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे हाडाचे फ्रॅक्चर तसेच तुटलेले हाड पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधा आणि सर्वोत्तम टीम.

बालरोग ऑर्थोपेडिक्स

लहान मुलांमधील अस्थिव्यंग, अपंगत्व, तसेच अस्थि-विकासात्मक आजार निवारण शस्त्रक्रियांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रुग्णालय.

जनरल ऑर्थोपेडिक्स

तुमच्या ऑर्थोपेडिक समस्यांचे मूळ कारण ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आमचे कुशल ऑर्थोपेडिक तज्ञ आजच्या काळातील अत्याधुनिक आणि प्रगत निदान तंत्रांचा वापर करतात.

जॉइंट प्रिझर्व्हेशन सर्जरी

कमी वयात सांध्यामध्ये झीज झाली असेल तर सांधा बदल शस्त्रक्रियेऐवजी सांधा सुरक्षित ठेवण्यासाठीचे वेदनारहित उपाय आहेत.

हात आणि पायांच्या दुखापती

हाताच्या आणि पायांच्या दुखापतींवर योग्य उपचार करून तुम्हाला पुन्हा पूर्ण कार्यक्षम बनवणे यासाठी आम्ही समर्पित आहोत.

तुमच्या सर्व ऑर्थोपेडिक समस्यांवरील सर्वोत्तम उपचार एकाच छताखाली!

आमचे हॉस्पिटल पेशंटच्या समस्येच्या निदानापासून उपचार आणि पुनर्वसनापर्यंत अनेक उत्तम ऑर्थोपेडिक सेवांची सुविधा प्रदान करते.

पेशंटचे हित..

आम्ही पेशंटची बाजू केंद्रस्थानी ठेवतो. यामध्ये राहण्याची उत्तम सुविधा देणाऱ्या सुसज्ज हॉस्पिटल बरोबर पेशंटची आर्थोपेडिक समस्या ओळखून त्यावर योग्य उपचार करणारी पारंगत टीम आहे. त्याबरोबरच पेशंटची आर्थिक समस्या सोडवण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विमा कंपन्यांना हॉस्पिटल संलग्न आहे. या आरोग्य विम्यांअंतर्गत पेशंटची आर्थिक समस्या सोडवली जाते.

आमचे तज्ञ डॉक्टर्स

डॉ. अजित शिंदे

एम. एस. (ऑर्थो.)

डॉ. निलिमा शिंदे

डीए. डी. (ऑर्थो.), ए. एफ. आय. एच.,

डॉ. रविराज शिंदे

एम. एस. (ऑर्थो.)

डॉ. तन्वी शिंदे

एम. एस. (ऑर्थो.), डी. एन. बी. (ऑर्थो.), एफ.सी. पी. एस.(ऑर्थो.)

रुग्णांच्या प्रतिक्रिया

बुक अपॉइंटमेंट

तुमची अपॉइंटमेंट बुक करा, तुमचे कल्याण पुन्हा मिळवा!

हॉस्पिटलबद्दल विचारले जाणारे प्रश्न..!

आठवड्याच्या प्रत्येक दिवशी २४ तास तुमच्या सेवेसाठी हजर !

आपातकालीन परिस्थितीत आपण 0233-2326491 / 2376707 या नंबरवर कॉल करू शकता. आमची टीम तुम्हाला मदत करण्यासाठी 24/7 उपलब्ध आहे.

आम्ही ऑर्थोपेडिक सेवांची विस्तृत श्रेणी ऑफर करतो, ज्यामध्ये सांधे बदलणे, क्रीडा दुखापतीचे उपचार, ट्रॉमा केअर, लहान मुलांचे ऑर्थोपेडिक्स, मणक्याचे शस्त्रक्रिया आणि बरेच काही यामध्ये समाविष्ट आहे. तुम्ही आमच्या वेबसाइटवर “आमची स्पेशालिटी ” विभागांतर्गत तपशीलवार माहिती मिळवू शकता.