गुडघ्याच्या शस्त्रक्रिया
गुडघा बदल शस्त्रक्रिया
तुमच्या गुडघ्यामध्ये वाटणारी अस्वस्थता हि भविष्यात उद्भवणारी मोठी समस्या असू शकते. त्यामुळे तुमच्या चालण्याच्या क्षमतेवर खूप मोठा परिणाम होऊन खऱ्या अर्थाने सुखाने आयुष्य जगण्यामध्ये हा खूप मोठा अडथळा ठरू शकतो. म्हणून वेळीच सावध होऊन त्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. म्हैशाळकर शिंदे आर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये आम्ही तुम्हाला या समस्यांवर उपाय देतोय ज्यामुळे तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून सुरळीत होईल. आपल्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्यांच्या वेगवेगळ्या समस्येवर विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया डिझाईन केलेल्या आहेत. गुडघ्यातील समस्या या प्रामुख्याने दोन प्रकारच्या असू शकतात. काहीठिकाणी पूर्णपणे गुडघा बदल करावा लागू शकतो तर काही ठिकाणी अंशतः बदलाची गरज असते. अश्या परिस्थितीमध्ये हि एक अशी वैद्यकीय प्रक्रिया आहे ज्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्णपणे कृत्रिम गुडघा बसवला जातो आणि त्याचबरोबर ज्याठिकाणी संपूर्ण गुडघा बदलाची गरज नाही अशा ठिकाणी आंशिक गुडघाबद्दल शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये पार पाडण्यात येते.
गुडघा बदल शस्त्रक्रिया कधी करण्यास सांगितली जाते ?
ज्या पेशंटना खालील समस्या उद्भवत आहेत त्यांच्यासाठी गुडघा बदल शस्त्रक्रियेची शिफारस केली जाते:
बसल्यानंतर सुद्धा गुडघ्यांमध्ये तीव्र वेदना होणे
चालताना होणाऱ्या गुडघ्याच्या तक्रारी आणि रोजची कामं करताना येणारी अडचण
गुडघ्यावर नियमितपणे येणारी सूज आणि आणि कडकपणा
औषधोपचार करूनसुद्धा दुखणं थांबत नसेल तर…
आमच्या सेवा
आम्ही दोन प्रकारच्या गुडघाबद्दल शस्त्रक्रियांची सुविधा पुरवतो. त्यामध्ये संपूर्ण गुडघा बदल शस्त्रक्रिया आणि अंशतः गुडघाबदल शस्त्रक्रिया या दोन शस्त्रक्रियांचा यामध्ये समावेश आहे. दोन्ही प्रक्रियांचा उद्देश हा पेशंटला होणारी वेदना कमी करण्याबरोबर गुडघ्याच्या जॉईंट मधील कार्य सुधारून गुडघा पूर्णपणे निरोगी बनविणे हा आहे.
संपूर्ण गुडघा बदल
गुडघ्यातील खालचे हाड, वरचे हाड आणि मधली वाटी या एकूण तीन घटकांपैकी जवळपास सगळाच भाग संधिवात आणि दुखण्याने प्रभावित झाला असेल तर त्या तिन्ही भागांच्या जागी कृत्रिम घटक वापरून गुडघा पूर्वीप्रमाणे सुरळीत केला जातो. गुडघ्यामध्ये गंभीर संधिवात किंवा जॉईन्टमध्ये मोठी दुखापत असेल तर हि उपचारप्रणाली प्रभावी ठरते.
आंशिक गुडघा बदल
गुडघ्याचे तीन भाग म्हणजे खालचे हाड, वरचे हाड आणि मधली वाटी यापैकी काही भाग संधिवाताने बाधित झाला असेल तर इथे संपूर्ण गुडघा बदलण्याची आवश्यकता भासत नाही. जितका भाग बाधित झाला आहे तितक्याच भागावर कृत्रिम पार्ट वापरून शस्त्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेला आंशिक गुडघा बदल म्हणतात.
गुडघा बदल शस्त्रक्रियेसाठी म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटलच का?
नैपुण्य
आमचे हॉस्पिटल गुडघाबद्दल शस्त्रक्रियेमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या कुशल डॉक्टर्सच्या टीमसाठी ओळखले जाते. आपला सखोल अनुभव आणि कौशल्य वापरून शस्त्रक्रियेनंतरच्या सर्वोत्तम रिजल्टसाठी आमची टीम वचनबद्ध आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान
सुयोग्य पद्धतीने सुरक्षित आणि यशस्वी गुडघा बदल प्रक्रियांसाठी सध्याच्या काळात उपलब्ध असणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि साधनसामग्रीचा आम्ही वापर करतो.
वैयक्तिक काळजी
आम्ही आमच्या प्रत्येक पेशंटला वेगळा समजतो आणि त्यांची नेमकी समस्या ओळखून त्यावर आधारित पुढची उपचारपद्धती आम्ही ठरवतो. ऑपरेशनच्या आधी समस्येचा अंदाज घेण्याबरोबरच ऑपरेशन झाल्यानंतर समस्येचे निराकरण होईपर्यंत आम्ही पेशंटशी वचनबद्ध आहोत.
रुग्णांना शिकवण
सगळ्या कालावधीदरम्यान आमच्याकडून पेशंटला संपूर्ण माहिती पुरवली जाते. यामध्ये पेशंटचे गैरसमज आणि भीती दूर करण्याबरोबरच सर्जरीनंतर त्यांना मिळणारे फायदे योग्य पद्धतीने सांगितले जातात.
गुडघा बदल शस्त्रक्रिया कार्यपद्धती -
1. पूर्वतयारी
सर्जरीच्या आधी तुम्हाला काही चाचण्यांना सामोरं जावं लागतं. ज्यामध्ये तुमची आजवरची वैद्यकीय माहिती तपासली जाते आणि त्याबरोबरच तुमच्या सध्याच्या शारीरिक स्थितीची सखोल चाचणी केली जाते. त्यानंतर आमचे सर्जन तुमच्या गुडघ्यावर होणाऱ्या प्रक्रियेबद्दल चर्चा करतात. तुमच्या प्रश्नांची उत्तरे देतात आणि तुम्ही शश्त्रक्रियेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तयार आहात याची खात्री करून घेतात.
2. सर्जरी
गुडघा बदल शस्त्रक्रिया हि भूल देऊन पार पाडली जाते. त्याबरोबरच प्रक्रियेदरम्यान तुम्ही पूर्ण आरामदायी अवस्थेमध्ये आहात याची खात्री केली जाते. त्यानंतर शश्त्रक्रियेदरम्यान खराब झालेले जोड आणि हाड काढून त्याजागी कृत्रिम घटक अचूकपणे बसवले जातात.
3. पुर्नवसन
प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला रिकव्हरी विभागात काही काळ ठेवले जाते. आमची टीम त्याठिकाणी तुमच्या पायाचे आणि गुडघ्याचे बारकाईने निरीक्षण करते. त्यानंतर तुम्हाला शारीरिक थेरेपी दिली जाते ज्याच्यामुळे तुम्हाला पुन्हा गतिशीलता मिळवण्यास मदत करते.
4. सर्जरीनंतरची काळजी
आमची टीम तुम्हाला कोणताही त्रास होत नाही याची खात्री करून घेते. तुमच्या गुडघ्यातील सुधारणेची माहिती घेते आणि सर्वात शेवटी उपचारांचे उत्कृष्ट परिणाम दिसण्यासाठी तुम्हाला काही व्यायाम पद्धती आणि शारीरिक क्रियांची माहिती दिली जाते.
