आमची स्पेशालिटी

आमची स्पेशालिटी

ऑर्थोपेडिक केअरला नवीन उंचीवर नेणे...

फ्रॅक्चर

अपघाती घटनांमुळे मोडलेले हाड पूर्णपणे पाहिल्यासारखे नीट करून देण्यासाठी आमची तज्ञ ऑर्थोपेडिक टीम तयार आहे. उपचारादरम्यान तुम्हाला त्रास होऊ न देता इलाज करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर्स आहेत.

गुडघ्याच्या शस्त्रक्रिया

आंशिक तसेच संपूर्ण गुडघा बदल शस्त्रक्रिया. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त भारतीय तसेच इंपोर्टेड गुडघा बदल पद्धती म्हैशाळकर शिंदे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध.

खुबा बदल शस्त्रक्रिया

झीज झालेल्या खुब्याच्या सांध्यांमध्ये होणाऱ्या वेदना तसेच खुब्याच्या हाडाचे अपघाती फ्रॅक्चर या कारणाने संपूर्ण खुबा बदल शस्त्रक्रिया पार पाडण्यात येते.

मणक्याची शस्त्रक्रिया

मणक्याचा वाकडेपणा म्हणजेच मणक्याचे कुबड सरळ करण्याची शस्त्रक्रिया तसेच मणक्याच्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी परिसरातील महत्वाचे हॉस्पिटल म्हणून ओळख.

खांद्याच्या शस्त्रक्रिया

खांद्याची झालेली झीज किंवा अपघाती फ्रॅक्चर तसेच निसटलेला खांदा पूर्ववत करण्यासाठी संपूर्ण खांदा बदल आणि रिवर्स खांदा बदल या दोन शश्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये उपलब्ध.

सर्व क्रीडा दुखापती आणि आर्थ्रोस्कोपी

खेळादरम्यान झालेल्या दुखापतींमुळे हाडाचे फ्रॅक्चर तसेच तुटलेले हाड पूर्णपणे पूर्ववत करण्यासाठीच्या अत्याधुनिक सुविधा आणि सर्वोत्तम टीम.

बालरोग ऑर्थोपेडिक्स

लहान मुलांमधील अस्थिव्यंग, अपंगत्व, तसेच अस्थि-विकासात्मक आजार निवारण शस्त्रक्रियांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रुग्णालय.

जनरल ऑर्थोपेडिक्स

तुमच्या ऑर्थोपेडिक समस्यांचे मूळ कारण ओळखण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी आमचे कुशल ऑर्थोपेडिक तज्ञ आजच्या काळातील अत्याधुनिक आणि प्रगत निदान तंत्रांचा वापर करतात.

जॉइंट प्रिझर्व्हेशन सर्जरी

कमी वयात सांध्यामध्ये झीज झाली असेल तर सांधा बदल शस्त्रक्रियेऐवजी सांधा सुरक्षित ठेवण्यासाठीचे वेदनारहित उपाय आहेत.

हात आणि पायांच्या दुखापती

हाताच्या आणि पायांच्या दुखापतींवर योग्य उपचार करून तुम्हाला पुन्हा पूर्ण कार्यक्षम बनवणे यासाठी आम्ही समर्पित आहोत.